 शेतकऱ्यांना शाश्वत वीज देणार
 विविध विकास कामाचे भूमिपूजन
 31 मार्च पूर्वी निधी खर्च करा

  भंडारा,दि. 17 :- तुमसर शहराच्या विकासासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी 31 मार्चपूर्वी खर्च करून हे शहर विदर्भात सर्वात सुंदर करा असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. तुमसर नगरपालिकेद्वारे आयोजित विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. निसर्गाचे नुकसान न करता शेतकऱ्यांना शाश्वत वीज देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
 खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार  गजेंद्र बालपांडे, माजी खासदार शिशुपाल पटले व मुख्याधिकारी अर्चना मेंढे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिनयान अंतर्गत 37 कोटी रुपये किंमतीची वाढीव पाणी पुरवठा योजना, 4.20 कोटींची नगर परिषद प्रशासकीय इमारत व बांगळकर शाळा नवीन इमारत या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 364 लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.
   तुमसर तालुक्यात एक हजार सोलर पंप वाटप करण्यात येणार असून यादी तयार करण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले. सर्व नळ योजना सोलरवर आणण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 2022 पर्यंत सर्वांना घरे, आयुष्यमान भारत योजना व पालकमंत्री पांदण रस्ते योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यानी दिल्या.
   पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरासमोर दोन वृक्ष लावण्यात यावे व यासाठी नगरपालिकेने नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना 8 तास पण शाश्वत वीज देण्याचा प्रयत्न आहे.  शासनाने एक शेतकरी एक रोहित्र योजना सुरू केली असून लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचे त्यानी सांगितले.
   2005 ते 2014 या काळात राज्यात 5 लाख 18 हजार कनेक्शन पेड पेंडीग होते या शासनाने ते पूर्ण केले आहेत. शेतकऱ्यांकडे देयक थकीत असले तरी वीज तोडली जाणार नाही असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांची यावेळी भाषण  झाली.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours