चंद्रपूर: टी वन वाघीण अर्थात अवनी हिच्या बछड्यांनी एका घोड्याची शिकार केली आहे. वनविभागानं बछड्यांसाठी हे सावज बांधून ठेवलं होतं. या बछड्यांनी शिकार केल्यानं त्यांची उपासमार होण्याची भीती नाहीशी झाली आहे.

सरकारच्या आदेशानंतर अवनी वाघिणीला ठार करण्यात आलं. त्यामुळे तिचे दोन बछडे भूक भागवण्यासाठी काय करणार, असा प्रश्न तयार झाला होता. त्यामुळे मग वनविभागाने या बछड्यांची उपासमार होऊ नये, म्हणून हे सावज बांधून ठेवलं होतं.

नरभक्षक म्हणून अवनी वाघिणीला तर मारलं पण आता तिच्या बछड्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित करत वनविभागावर मोठी टीका होत होती. त्यानंतर वनविभागाने या बछड्यांसाठी सावज ठेवण्याचा निर्णय घेतला. अवनीच्या बछड्यांनी हे सावज खाल्ल्यामुळे वनविभागासाठी हा मोठा दिलासा आहे. या बछड्यांनी कक्ष क्र. 655 मध्ये ही शिकार केली आहे.

काय आहे अवनी प्रकरण?

चंद्रपुरातील अवनी ही वाघीण नरभक्षक आहे, असं सांगत या वाघिणीला राज्य सरकारच्या आदेशानंतर ठार केलं गेलं. भाजप नेत्या आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनीही संताप व्यक्त केला होता. ‘या प्रकरणी मी राजकीय आणि कायदेशीर कारवाईचा विचार करत आहे,’ असंही मनेका गांधी यांनी ट्विट करत म्हटलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours