बदलापूर, 2 नोव्हेंबर : बदलापूर नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावाने चक्क ५० लाखांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाटील यांना बँकेकडून अचानक कर्जाचे थकित हप्ते भरा अशी नोटीस आल्याने त्यांना धक्काच बसला.
पाटील यांनी बदलापूर पूर्व एचडीएफसी बँकेतून एक वर्षापूर्वी कार लोन घेतले आहे. त्या लोनचे हप्तेही ते नियमित भरताहेत. असे असतांना, अचानक एचडीएफसी बँकेकडून पाटील यांना तुमचे ५० लाख रुपयांच्या कर्जाचे हप्ते थकले असून तातडीने पैसै भरावेत अशी नोटीस त्यांना पाठवली.मात्र या लोन केसशी माझा काहीही एक संबंध नसताना त्यांनी माझ्या नावाने ५० लाख रुपयांचं लोन मंजूर केलंच कसं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणामुळे पाटील याना प्रचंड मानसिक त्रास होत आहे.
या बाबात एचडीएफसीच्या बदलापूर बँकेचे व्यवस्थापक जितेश यादव यांनी आपण बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून श्रीधर पाटील यांच्या नावाने कोणतेही लोन नाही असे पत्र तातडीने देतो असे त्यांना सांगितले. मात्र, या गंभीर प्रकाराबाबत चौकशी करण्याची मागणी श्रीधर पाटील यांनी केलीय.
Post A Comment:
0 comments so far,add yours