रायगड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राम मंदिर, राफेल करार आणि सरदार पटेलांच्या स्मारकावरून मोदी सरकारवर घणाघात केला आहे. सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभारलात मात्र त्यांच्या उंचीसमोर तुमची उंची तपासून पहा, असा टोलाच त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

तसंच राफेल विमानं तिप्पट किमतीनं खरेदी करणे हा घोटाळा नाही का?  अशा शब्दात मोदी सरकारवर त्यांनी ताशेरे ओढलेयत. तर राम मंदिरासाठी कायदा करा, माझा त्याला जाहीर पाठिंबा असेल असं वक्तव्य देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

गडकरींना खात्रीच नव्हती सरकार येईल का, पण मला खात्री आहे. येत्या निवडणुकीत आपलंच सरकार येणार आहे, असा आत्मविश्वास शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जतमध्ये आयोजित रायगड लोकसभा मतदार संघाच्या सभेत व्यक्त केला आहे.

काल वल्लभभाईंचा पुतळा उभारला. पुतळा जेवढा मोठा आहे.  त्यासमोर तुमची उंची पहा किती आहे ते. वल्लभभाईंचे कोणते गुण तुमच्यात आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours