रिपोर्टर: परदेशी 
भंडारा:— अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा रामगिरी  ( डोंगरगाव ) येथे गेल्या काही दिवसापासून स्वत:च्या अंगात दैविशक्ती प्राप्त झाल्याचा दावा करून भोड्या भाड्या लोकांना चमत्काराच्या नावावर आर्थिक , मानसीक फसवणूक करीत असल्याची तक्रार मअनिस जिल्हा शाखा भंडारा कडे प्राप्त झाली . त्या नुसार महाअंनिस चे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे , चंद्रशेखर भिवगडे , कन्हैया नागपूरे , सौ. अश्विनी भिवगडे , सौ. त्रिवेणी वासनिक , पुरूषोत्तम गायधने , लिलाधर बनसोड यांनी ढोंगी बाबा विरोधात सर्व पुरावे गोळा करून ढोंगी बाबा विरोधात अड्याळ पोलीस स्टेशन जि. भंडारा येथे तक्रार दाखल केली . या तक्रारी नुसार पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे व त्यांच्या पोलीस सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन या ढोंगी बाबाचा भंडाफोड करून या ढोंगी बाबावर महाराष्ट्र नरबळी आणि ईतर अमानुष , अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ चे कलम ३ (२) व मे. ड्र. मे. अॅक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली . ढोंगी बाबाची " जिवन लिला अमृत " नावाची पुस्तिका लेखन व प्रकाशीत करुन समाजात अंधश्रद्धा पसरविणार्‍या लेखीकेवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी महाअंनिसने मागणी केलेली आहे .


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours