मुंबई, 12 नोव्हेंबर : मराठी समाजाच्या मुद्द्यांवर कायम आंदोलन करणारे आणि परप्रांतीयांविरोधात भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहे. मुंबई आयोजित उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशापांडे यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून ही माहिती सांगितली आहे.
2 डिसेंबरला कांदिवलीत उत्तर भारतीय मंचचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांनी कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आणि त्यांनी ते स्वीकारलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.
'मा.राजसाहेबांनी उत्तर भारतीय मंच ने दिलेले आमंत्रण स्वीकारले असून दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी हा कार्यक्रम कांदिवली येथे होणार आहे' असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे
Post A Comment:
0 comments so far,add yours