यवतमाळ: केंद्र आणि राज्य सरकारकडून अवनीच्या मृत्यू संदर्भात चौकशी करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या नेमण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची एक समिती तर राज्याच्या वन विभागाकडून  चौकशीसाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. त्यामुळे अवनीबद्दल नेमकं काय झालं याचा खुलासा आता होणार अशी आशा वाघ्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.

वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य श्री बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री नितिन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

तर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची एक समिती सदस्य नेमण्यात आली आहे. त्यात ओ पी कालेर, जाईस लुईस आणि हेमंत कामडी काम पाहणार आहेत.

गुरूवारी आलेल्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार अवनीला बेशुद्ध न करता थेट गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे यातून वनविभागाचा भोंगळा कारभार सगळ्यांसमोर उघड झाला होता. त्यावर आता स्पष्टीकरण देण्यासाठी या समित्या नेमण्यात आल्या आहे.

अवनी वाघिणीचा मृत्यु हा बंदुकीची गोळी लागल्यामुळे अतिरक्तस्त्रावामुळेच झाल्याचा निष्कर्ष न्युज 18 लोकमतच्या हाती लागलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काढण्यात आला. यवतमाळच्या जंगलातल्या टीवन अर्थात अवनी वाघिणीच्या मृतदेहावर इनकँमेरा पोस्टमाँर्टम करण्यात आलं. यात गोळी शरीराच्या मागून मारल्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.

पोस्टमार्टम रिपोर्टमुळे वनविभागाचा खोटारडेपणा उघड झाला असून टीवन अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचं पुढे आलं. यवताळच्या राळेगाव जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेण्याचा आरोप असणऱ्या अवनी टीवन वाघिणीला गोळ्या घालण्याचे आदेश राज्याचे मुख्यप्रधान वनसंरक्षक ए के मिश्रा यांनी आदेश दिले होते. त्याला वाघप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

त्यावर आता या समित्या पुन्हा तपास मोहिम करणार आहेत. या दोन्ही समित्या 22 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबरला त्यांच्या पहिला अहवाल सादर करणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours