नागपुर : नागपुरच्या नंदनवन परिसरातील खरबी परिसरात वर्चस्वाच्या लढाईतून दोन रिक्शा चालकांनी दुसऱ्या एका मालवाहू रिक्शा चालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र देशमुख असं या मृत ड्रायव्हरचे नाव असून आरोपींचे नावे गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख असे आहे.

मृत राजेंद्र देशमुख हा खरबी परिसरामध्ये राहत होता. परिसरातील लहान-मोठे वाद तो सोडवायाचा. अशातच गेल्या आठवड्यात वाद सोडवण्यासाठी त्याने एकाला मारहाण केली होती.

राजेंद्र्चे परिसरात वर्चस्व वाढत असल्याचे पाहत आरोपी गोलू ठाकरे आणि एजाज याने त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह आटो रिक्षामध्ये ठेऊन परिसरात आणला.

राजेंद्रचा खून केल्यानंतर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी आरोपींनी मृतदेह ठेवलेली रिक्शा सीसीटीव्ही असलेल्या परिसरात नेला आणि मृतदेहावर पुन्हा शस्त्रांनी हल्ला केला.

सीसीटीव्हीमध्ये मृत राजेंद्रला मारहाण करत असल्याचं रेकॉर्ड व्हावं, लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून आरोपीने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांच्या प्राथिमक तपासात उघड  झालं आहे.

दरम्यान हा संपुर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागपूर परिसरात भीतीचा व्हिडिओ व्हायरल.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours