मुंबई, 27 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासंदर्भात आज सकाळी दहा वाजाता सर्वपक्षीय गट नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तर विरोधक या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात पूर्ण अहवाल विधीमंडळ सभागृहात पटलावर ठेवण्याबाबत ठाम भूमिकेवर आहेत.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण आणि इतर शैक्षणिक सवलती सुविधा योजना सुरू ठेवण्याबाबत आग्रही भूमिका मांडणार अशी भूमिक मराठा आंदोलकांकडून घेण्यात आली आहे. एटीआर रिपोर्ट नाही तर संपूर्ण अहवाल मांडावा ही विरोधी पक्षांच्या गट नेत्यांची भूमिका आहे, अशी माहिती सुत्रांकजून देण्यात आली आहे.
संपूर्ण अहवाल मांडण्यास सरकार अनुकूल नाही तर विरोधकांची मागणी संपूर्ण अहवाल मांडण्याबाबतच ठाम आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे आरक्षणासाठी मांडण्यात येणाऱ्या विधेयकाच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या दालनात ही बैठक पार पडली. या बैठकीला विनोद तावडे, सुभाष देशमुख, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, विष्णू सावरा, एकनाथ शिंदे आणि दीपक सावंत उपस्थित होते.
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भातला एटीआर म्हणजेच संपूर्ण अहवाल सादर करायचा की नाही यासंदर्भात आज म्हणजे मंगळवारी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours