भंडारा :— जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर अन्यायग्रस्त बायाबाई बनकर , सयाबाई नेरकर , बयाबाई नगरधने , अनुसया आंबेकर, जनाबाई नंदुरकर , भगवान बनकर , किसन बनकर हे गेल्या अनेक वर्षापासून मौजा खास भंडारा व पिंगलाई येथील गट क्र. ६८२ व ६१७ या शेतीवर वहिवाट , जोत , कब्जा असून या शेत जमिनीत धान , गहू , चना या पिकांचे ऊत्पादन गेल्या अनेक वर्षापासून काढत आहेत . सदर प्रकरण मा. तहसिलदार भंडारा यांचे कडे सुरू असतांना परस्पर संगनमत करून शेतजमिनीचा खरेदी विक्रिचा सौदा करण्यात आलेला आहे . त्यामुळे स्वत: शेती कसणार्‍या शेतकरी कुटूंबावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे . न्याय मिळण्यासाठी दि. १२/११/२०१८ पासून बेमूदत आमरण ऊपोषण सुरू आहे . सदर ऊपोषण मंडपाला सामाजीक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे , कन्हैया नागपूरे व विविध सामाजीक संधटनांनी समर्थन दिले आहे .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours