भंडारा जिल्हाची बुलंद तोफ, आदिवासी आणि गोरगरिबांचे कैवारी, क्रांतिकारी नेता कांग्रेस चे जेष्ठ नेते,माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचे आज नागपुर येथे एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले,ते ८४ वर्षाचे होते.
 गेल्या आठवड्यापासून नागपूर येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर किडनीच्या आजारांवर उपचार सुरू होते.
  त्यांनी तुमसर मतदार संघातून तिन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक विकासकामे करून गोरगरिब आणि विशेषता आदिवासी समाजात आपली  एक वेगळी ओळख कायम करुन त्यांच्या हृदयात आपले नाव कोरून घेतले.तेअष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.क्षेत्राचा विकास आणि गरीबांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सरकारसी अनेक वेळा संघर्ष केले.आपल्या मतदार संघावर सरकार चे दुर्लक्ष पाहुन त्यांनी भरल्या अधिवेशनात सभागृहात आपल्या पायाची चप्पल थेट मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर फेकून मारली आणि आपल्या मतदारसंघाकडे सरकार सकट सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते है त्यांच्या क्रांतिकारी कार्याची ओळख होती.एक अशा क्रांतिकारी नेता आज आमच्या मधुन हरपला.त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो.ॐ शांती शांती..!
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours