3 डिसेंबर रोजी अपंग दिन साजरा करणे बाबात सभेचे आयोजन

भंडारा  दि. 27:- प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे म्हणून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देश्याने भारत निवडणूक आयोगाने “सुलभ निवडणूका” (Accessible Election) हे घोष वाक्य जाहिर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणयात येत आहेत. त्याच अनुषंगाने अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतुने 3 डिसेंबर रोजी अपंग दिन साजरा करणेबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त् झाले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सुलभ निवडणूक जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन व्यापक स्तरावर प्रचार प्रसार करुन अपंग नव मतदारांचे सत्कार करुन कार्यक्रम साजरा करण्याचे निर्देश दिले.
सदर कार्यक्रम प्रत्येक विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार असून तालुकानिहाय मतदार केंद्र स्तरावर, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व बुथ अधिकारी यांना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 3 डिसेंबर रोजी प्रत्येक बुथ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नोंदणी झालेल्या अपंग मतदरांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणेबाबत तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा संदर्भात माहिती देवून अपंग नव मतदारांचे सत्कार करुन अपंग दिन आयोजित करणेबाबतची जबाबदारी देण्यात आली. अपंग मतदारांसाठी विविध शैक्षणिक संस्थानमध्ये अपंग घटकांना सामावून घेणेच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश सदर बैठकीत उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिले आहे. 
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी 31 ऑक्टोबर पर्यंत जिल्हा प्रशासनातर्फे समाजातील प्रत्येक घटकांसाठी तसेच अपंग, मुकबधीर, कर्ण बधीर मतदारांसाठी विशेष मोहिम राबवून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची मोहिम राबविण्यात आली होती. तसेच मुकबधीर, कर्णबधीर या नवीन मतदारांशी संवाद साधण्याकरीता सांकेतीक भाषाची कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत क्षेत्रात कार्यकरणारे अधिकारी - कर्मचारी यांना मुक, कर्ण बधीर नविन मतदारांशी संवाद कसा प्रकारे स्थापीत करायचे या बाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटक महत्वाचा असून या वेळेस “सुलभ निवडणूका” ची तयारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे तसेच अपंग दिनाच्या कार्यक्रमात जास्तीत-जास्त अपंग मतदारांनी सहभाग घ्यावे असे आवाहन निवडणूक उपजिल्हाकारी विलास ठाकरे यांनी केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours