रिपोर्टर परदेशी
गट विकास अधिकारी श्रीमती सावंत यांनी दाखविली हिरवी झेंडी
शाश्वत स्वच्छतेसाठी एलईडी व्हॅनद्वारे होणार जनजागृती
भंडारा : राज्यस्तरीय एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर शाश्वत स्वच्छता, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयाचा वापर व स्वच्छता, व अन्य पाणी व स्वच्छता विषयाची ग्रामस्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एलईडी व्हॅनचा शुभारंभ आज दिनांक 28 नोव्हेंबर 2018 ला पंचायत समिती भंडारा येथे गट विकास अधिकारी श्रीमती नुतन सावंत यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य श्री प्रल्हादजी भूरे, कृषी अधिकारी श्री झोडपे, विस्तार अधिकारी श्री प्रमोद हुमने, पशुधन विभागाच्या पर्यवेक्षिका श्रीमती सविता वाढई, विस्तार अधिकारी (कृषी)रंजू अनित्य,मनुष्यबळ विकास सल्लाागार श्री अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार श्री राजेश येरणे, ग्रामसेवक शिल्पा गाडेकर, तालुका व्यवस्थापक (आपले सेवा केंद्र) श्री राकेश ठोंबरे, गट समन्वक श्री नागसेन मेश्राम, आर डब्लयू प्रमोशन्स चे श्री माधव तोळे,गुलशन सिंग, पप्पू पाल यांची उपस्थिती होती.
पाणी पुरवठा स्वच्छता विषयक संदेश प्रसारीत करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने राज्यात पुढाकार घेण्यात आलेला आहे. या माध्यमातून प्रत्येक जिल्हयात 150 गावांमध्ये या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. भंडारा जिल्हयाला पाणी पुरवठा व स्वच्छता विषयाचे संदेश प्रसारित करण्यासाठी एलईडी व्हॅन मिळाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र जगताप यांचे मार्गदर्शनात तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)श्री ज्ञानेश्वर सपाटे यांचे नेतृत्वात आज दिनांक 28 नोव्हेंबर 2018 ला पंचायत समिती भंडारा येथे एलईडी व्हॅनचा शुभारंभ गट विकास अधिकारी श्रीमती नुतन सावंत यांचे हस्ते करण्यात आला. भंडारा तालुक्यात 28 गावांमध्ये एलईडी व्हॅनच्या माध्यमातून उदया दिनांक 29 नोव्हेंबर 2018 पासून गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यानंतर मोहाडी, तुमसर, साकोली, लाखांदूर, पवनी आदी तालुक्यात एलईडी व्हॅनच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल.






Post A Comment:
0 comments so far,add yours