जिल्हास्तरीय युवा महोत्सव

भंडारा  दि. 28:- भारत देश हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. युवांमधील धडाडी, नाविण्य जाणून घेण्याची तळमळ, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच समाजकार्य करण्याची प्रवृत्ती देशाच्या व राज्याच्या विकास प्रक्रीयेत भारताला महासत्ता बनविण्यात तरुण वर्गाची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन रोजगार व कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक शैलेश भगत यांनी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी केले. 
क्रीडा व युवक सेवा सचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद भंडारा यांचे वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 26 व 27 नोव्हेंबर 2018 या कालावधीत पोलीस कल्याण सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक हिम्मत वैद्य होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजय क्रिडा मार्गदर्शक भोजराज चौधरी व नेहरु युवा केंद्राचे रमेश अहिरकर उपस्थित होते. 
अध्यक्षीय भाषणात हिम्मत वैद्य यांनी युवकांना प्रोत्साहित करतांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तसेच युवकांच्या अंगी असलेले सुप्त कलागुणांना वाव देवून अव्वल दर्जाचे कलावंत निर्मितीसाठी रंगमंच उपलब्ध होणे आवश्यक आहे. प्रास्ताविकातून भोजराज चौधरी यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महत्व विषद केले. 
या स्पर्धेकरीता पंच म्हणून प्रा. डॉ. अस्मिता नानोटी, स्नेहा हांडे, मनोज दाढी, सारंग हांडे, विनोद पत्थे, नामदेव बोळणे, एस.आर. खिलोटे, मिना गुरनुले यांनी काम पाहिले. सदर स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न झाल्या असून विभागीय युवा महोत्सवाकरीता लोकनृत्य- लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडारा, लोकगित-सनफ्लॅग स्कुल वरठी, एकांकिका- सनफ्लॅग स्कुल वरठी,गिटार-सक्षम सिंग, तबला-परेश घुगुसकर, हार्मोनियम-अवंती पत्थे, शास्त्रीय गायन-समृध्दी हांडे, भरतनाटयम-प्रविण निपाने, बासरी-शिवशंकर माकडे, वकृत्व-उन्नती सिंग यांची निवड झाली असून विजयी संघ व लाकारांना जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संविधान दिनाचे औचित्यसाधून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यातआले. 
युवा महोत्सवाचे संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोले यांनी केले तर आभार क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रामभाऊ धुडसे, पुरुषोत्तम साठवणे, तुषार नागदेवे, वसंत पाल यांनी परिश्रम घेतले. 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours