ठाणे, 22 नोव्हेंबर : शेतकरी, शेतमजूर, आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या वतीनं  ठाणे ते विधानभवनापर्यंत मोर्चा निघाला आहे. मुंबईकरांची आणि खासकरून शाळकरी मुलं, चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होवू नये म्हणून हा मार्चा रात्रीच विधानभवनाकडे निघाला. या मोर्चाला उलगुलान मोर्चा असं नाव देण्यात आले आहे. हजारो कष्टकऱ्यांचा हा मोर्चा थोड्यावेळात आझाद मैदानावर दाखल होईल.

संकटमोचक अशी ओळख असणारे भाजप नेते गिरीश महाजनांनी या मोर्चामध्येही मध्यस्थाची भूमिका घेतली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोर्चेकऱ्यांची भेट घडवून देण्याचं आश्वासन महाजनांनी दिलंय. त्यामुळे मोर्चेकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय.

दरम्यान, आझाद मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ न्यायाधीश बी.जे कोळसे पाटील असतील. यानंतर मुंबई विधानभवनावर मोर्चा धडकणार आहे. हजारो शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत भर उन्हातान्हात पायपीट करत आपल्या न्याय हक्कासाठी निघाले. लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलाय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours