मुंबई : नाशिक माहापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झालीय. आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळं मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत. 2005 च्या बॅचचे चे IAS अधिकारी आहेत. प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. गेल्या 12 वर्षात त्यांच्या तब्बल 11 वेळा बदल्या झाल्यात.
धडाकेबाज काम, हट्टी स्वभाव आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची वृत्ती यामुळं त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आलाय. वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठेच टिकले नाहीत. मात्र या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावतात. गैरव्यवहार मोडून काढतात.
लोकप्रतिनिधींची मनमानी बंद करतात त्यामुळं त्यांची वारंवार भांडणं होतात. त्यांच्याविरूद्ध आंदोलनं होतात. नाशिकमध्ये नगरसेवकांविरूद्धच्या वादात एकदा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केली मात्र काही महिने वगळता शांतता फार काळ राहिली नाही. आपल्या स्वभावाला मुरड घाला असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं मात्र मुंढेंनी कधीच आपला स्वभाव बदलला नाही.
Post A Comment:
0 comments so far,add yours