मुंबई: परदेशात गेल्यानंतर अनेक मुलींना आपलं अस्तित्व हरवल्यासारखं होतं. पण अशावेळेस निराश न होता आपल्यातलं सामर्थ्य ओळखलं तर परदेशातही आपली ओळख निर्माण होते. हेच दाखवून दिलंय फिलाडेल्फियाच्या कीर्ती श्रीखंडे यांनी. त्यांच्या सुगरणपणाला वाव मिळाला आणि म्हणूनच फिलाडेल्फियाच्या नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अशा रेस्टॉरंटमध्ये त्यांना भारतीय पदार्थांच्या सादरीकरणासाठी बोलावण्यात आलं.

अमेरिकेत पुलाव आणि दाल तडका हे अस्सल भारतीय पदार्थ आणि त्यांच्या रेसिपीज कीर्ती श्रीखंडे इंग्रजीमधून समजावून सांगतात. सध्या कीर्ती श्रीखंडे अमेरिकेतल्या फिलाडेल्फियामध्ये राहतात. फूड ब्लॉगर आणि भारतीय पदार्थ परदेशामध्ये लोकप्रिय करणाऱ्या म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली आणि अगदी मध्यमवर्गातून आलेल्या किर्तीताईंसाठी हा प्रवास सोपा नव्हता.

पुण्यातल्या मध्यमवर्गीय घरातल्या कीर्ती श्रीखंडे फिलाडेल्फिया इथं 2009 साली शिफ्ट झाल्या. तिथे गेल्यावर त्यांच्यासाठी सगळंच नवीन होतं. सुरुवातीला व्हिसाच्या अडचणींमुळे त्या लगेचच नोकरी करू शकत नव्हत्या. अगदी 2013 सालापर्यंत त्या नोकरी करू शकल्या नाहीत. पण त्यांनी हार मानली नाही. हाताला असलेली चव आणि स्वयंपाक करण्याची आवड यामुळे त्यांनी घरबसल्या विविध पदार्थ करायला सुरुवात केली. त्यांनी नवीन रेसिपीज शोधून काढल्या, केल्याही आणि स्वत:चा फूडब्लॉग लिहायलाही सुरुवात केली
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours