सीमेवर शत्रूच्या जवानांना पाणी पाजणारे हे लढवय्या आज दऱ्या खोऱ्यातल्या झाडांना पाणी देण्याचं काम करताहेत. पाणी दिल्यानंतर जमिनीतील ओलावा राहावा म्हणून गवताचा, नारळाचा काथ्या टाकून ओलावा टिकवण्याचं कामही ते करत आहेत.

लष्कराचे जवान शिस्त आणि कठोर परिस्थितीत काम उत्तम करतात. दौलताबादच्या डोंगरमाथ्यावर लावलेली 52 हजार झाडं जगवण्याची जबाबदारी या बटालियनवर आहे. लावलेल्या झाडांपैकी 95 टक्के झाडं या जवानांनी जीवापाड मेहनत करून जगवली. झाडांची झालेली चांगली वाढ बघून कठोर मनाच्या जवानांच्या डोळ्यातही दाटून येतं.

राज्यात अश्या पद्धतीची एकच इको बटालियन आहे आणि ती मराठवाड्यात झाडं वाढवण्याचे कठीण काम करीत आहे वनविभाग आणि लष्कराचा हा संयुक्त उपक्रम आहे. अनेक ठिकाणी वृक्षारोपण होत मात्र त्यानंतर त्या झाडांचे काय झाले याचा हिशेब कुणी ठेवत नाही. या अनोख्या युद्धात आम्ही दुष्काळावर मात करू असा विश्वास या जवानांना आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours