तिरुअनंतपुरम, 16 नोव्हेंबर  : शबरीमाला मंदिर प्रवेशासाठी आग्रह धरणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मंदिर भक्तांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. आज (शुक्रवार) या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळात दाखल झालेल्या तृप्ती देसाई यांना महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी विमानतळावरच रोखून धरलं आहे.
‘मला राज्य सरकारनं संरक्षण दिलं आहे. त्यामुळे माझ्या जीवाला काही झाल्यास त्याला संपूर्णपणे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार राहील,’ अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
काय आहे वाद?
शबरीमाला मंदिरात वर्षानुवर्ष स्रियांना प्रवेशबंदी आहे. मोठ्या लढ्यानंतर शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. पण त्यानंतर केरळातील सामाजिक-राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महिलांचा मंदिर प्रवेश म्हणजे मंदिराची विटंबना आहे, असं म्हणत केरळात कथित संस्कृतीरक्षक रस्त्यावर उतरले आहेत.
तृप्ती देसाईंकडून याआधीही आंदोलन
'शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही आणी मोदीजी साई मंदिरात दर्शनाला जाताहेत. शबरीमाला येथे महिलांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे,' असा आरोप तृप्ती देसाईंनी केला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours