मुंबई, 12 डिसेंबर : देशातील पाच राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर तेलंगणा आणि मिझोराम प्रादेशिक पक्षांकडे गेले आहे. या पराभवानंतर सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेबरोबर भाजपचा 'सामना' झाला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. 'थापा मारून नेहमी जिंकता येत नाही,' असं म्हणत शिवसेनेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

या 10 मुद्द्यांवरून शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल 

-श्री. मोदी व श्री. शहा यांनी काँग्रेसमुक्त भारतचे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच भाजपमुक्तचा संदेश आता दिला आहे. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत!

-थापा मारून सदासर्वकाळ विजयी होता येत नाही. राजस्थानात शेतकरी अडचणीत आहे. मध्य प्रदेशात न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर गोळ्या घातल्या गेल्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफी मागितली, पण शेतकऱ्यांनी शेवटी मतपेटीतून सूड घेतला. 

-नोटाबंदीसारख्या भंपक निर्णयाने अर्थव्यवस्था कोसळली. लोकांचे रोजगार गेले व महागाई वाढली. 

-जनता होरपळत असताना आमचे पंतप्रधान जगाचे राजकारण करीत ‘उडत’ राहिले. ते थेट चार राज्यांच्या निवडणूक प्रचारात उगवले.

-पंतप्रधान शेवटी भावनिक प्रश्न घेऊन भाषणे देत राहिले. राहुल गांधी मला ‘भारत माता की जय’ बोलण्यापासून रोखत आहेत’ किंवा राममंदिर उभारणीस काँग्रेस अडथळे आणीत आहे’, अशी पोरकट विधाने त्यांनी केली. ती त्यांच्यावरच उलटली.

-जे उर्जित पटेल नोटाबंदीचे समर्थन करीत होते त्यांनीही कंटाळून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद आता सोडले. 

-हिंदुस्थान चार-पाच व्यापारी डोक्याने चालवला जात आहे व त्यात रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था मोडल्या जात आहेत. जगात इतकी आर्थिक अनागोंदी कधी झाली नसेल.

-राज्य चालवणे म्हणजे पेढी चालवणे, त्या पेढीतून टेबलाखालच्या पैशाने निवडणूक जिंकणे, हे सर्व असेच राहील या भ्रमात जे होते त्यांना मोठा धक्का जनतेने दिला. 

-पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. 

-लोकशाहीत पैसा, ईव्हीएम घोटाळा, दहशतवादाची पर्वा न करता जनतेने उगाच हवेत उडणाऱ्यांना जमिनीवर उतरवले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours