ना. दिपक केसरकर
• (कायदा व सुव्यवस्था, नक्षलग्रस्त क्षेत्र आढावा बैठक संपन्न )
जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
भंडारा,दि. 10 :- पोलीसांनी नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भागात जावून साक्षतेचे प्रमाण वाढवावे व जनजागृती करावी. गुन्हेगाराला भिती वाटली पाहिजे तर नागरिकांना आपले मित्र वाटले पाहिजे असे वागा. चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण पोलीस विभागास दोषी ठरविण्यात येईल असे काम करु नका, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री ना. दिपक केसरकर यांनी केले.
कायदा व सुव्यवस्था, नक्षलग्रस्त क्षेत्र आढावा बैठक पोलीस मुख्यालयाच्या चैतन्य हॉल मध्ये घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस उपमहानिरिक्षक अंकूश शिंदे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, गोंदियाचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधिक्षक विनीता साहू, गोंदियाचे पालीस अधिक्षक दिलीप भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते.
पोलीस गृहनिर्माणाबाबतचा आढावा घेतांना गृह राज्यमंत्री केसरकर म्हणाले, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी नवीन इमारती बाधण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेत वेगळा उपशिर्ष तयार करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यात त्यांच्या आवडी निवडी जाण्याव्या व तशा प्रकारे नियोजन करुन प्रस्ताव सादर करावा. जिथे नवीन पोलीस स्टेशन होणार आहे, तिथे राहण्यासाठी वसतीगृहाची सोय करण्यात येणार आहे. पोलीसांच्या कुटूंबाची व त्यांच्या पाल्याची सोय लक्षात घेवून त्यांना पाहिजे तिथे निवासाची सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्हा जूना असल्यामुळे तेथील पोलीस निवास खराब झाले आहे त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. जनावराच्या अवैध वाहतूकीचा प्रश्न सर्व राज्यात आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे, असे गृह राज्यमंत्री म्हणाले.
गोदिया जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. पोलीसांनी नक्षलग्रस्त आदिवासी बहुल भागात जावून नागरिकांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढवावे व जनजागृती करावी. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. नक्षलग्रस्त भागात छोटे पोलीस स्टेशन स्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीसांच्या निवास, आरोग्यावर निधीची कमतरता पडू देणार नाही . जिल्हा वार्षिक योजनेतून या क्षेत्रासाठी भरीव मदत करण्यात येणार आहे. वाहनाविषयी आढावा घेतांना ते म्हणाले, आधी तांत्रिक बाबी तपासा नंतर प्रस्ताव सादर करा. सॅटेलाईन फोन नक्षलग्रस्त भागात फार उपयोगी आहे. ज्यामुळे कूम्युनिकेशन सोईचे होते. तसेच घनदाट जंगलात त्याचा फायदा होतो. नक्षलवाद कसा रोखता येईल याकडे पोलीस विभागाने जातीने लक्ष देवून त्या भागातील आदिवासी समाजात जनजागृती करावी. पोलीस विभागातर्फे बिरसा मुंडा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काढलेल्या एकता दौडीमुळे समाजात जी जनजागृती झाली त्याबद्दल त्यांनी गोंदिया पोलीस विभाग व प्रशासनाची प्रसंशा केली.
नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा त्राण असतो. त्यांचे आरोग्य व निवासाच्या सर्व सुविधा सोडविण्याचा शासन प्रयत्न करेल. पोलीस विभागाने निवासाच्या बाबतीत सर्वे करावा. भंडारा पोलीस विभागाचे काम चांगले आहे. अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. पोलीसाची प्रतिमा चांगली राहीली पाहिजे . नागरिकांनी त्यांना मित्र म्हणून पाहिले पाहिजे. दोन्ही जिल्हयातील पोलीस विभागाने दारुबंदी व अवैध दारु वाहतूकीवर नियंत्रण ठेवावे. नागरिकांशी सौजन्याने वागावे.
यावेळी दोन्ही जिल्हयातील पोलीस निवास्थान, पदे, रिक्त पदे, पोलीस स्टेशन , फिरते व मोबाईल पोलीस स्टेशन, गुन्हे प्रकरणे, अवैध दारु, रेती प्रकरण, बाल व महिला अत्याचार प्रकरण, गोसीखुर्द सुरक्षा, नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था, मिशन संभव, विकास व शांती सप्ताह, रक्षा बंधन-सुरक्षा बंधन, शहरातील वाहतूक, सायबर क्राईम, सीसीटिव्ही कॅमेरे, जनावरांची अवैध वाहतूक, सॅग प्रकल्प, नक्षलवादयांचे आत्मसमर्पण, पोलीस वाहन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, कायदा व सुव्यवस्था आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी पोलीस अधिक्षक विनीता साहू व गोंदियाचे पोलीस अधिक्षक दिलीप भूजबळ यांनी आपआपल्या जिल्हयातील पोलीस विभागाची माहिती पॉवर प्रेझेंटेशनद्वारे सादर केली. कार्यक्रमाचे संचलन पोलीस उपअधिक्षक एस.व्ही. कुलकर्णी यांनी केले. तर आभार पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी मानले. यावेळी दोन्ही जिल्हयातील पोलीस विभागाचे अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
00000
Post A Comment:
0 comments so far,add yours