जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी
भंडारा,दि. 11 :- दैनंदिन जीवनात घडत असलेल्या कृत्रिम अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटूंब उध्वस्त होतात. या आपत्तीवर मात करण्यासाठी योग्य आपत्ती व्यवस्थापनाची माहिती प्रत्येक नागरिकांना असणे गरजेचे आहे. या करीता शासनस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे. या करीता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची निर्मिती करुन या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाची माहिती पोहचविण्याचे कार्य शासनाच्या माध्यमातून होत आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून दिलेल्या प्रशिक्षणामुळे मानवावर नकळत येणाऱ्या आपत्तीवर प्राथमिक स्तरावर उपाययोजना करुन मोठी हानी टाळता येते, असे तहसिलदार मलिक विरानी यांनी प्रतिपादन केले. 
स्थानिक तालुका प्रशासनाच्या वतीने स्वागत सेलीब्रेशन मंगल कार्यालय, लाखनी येथे तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.   प्रथम सत्राच्या शुभारंभ प्रसंगी कार्यशाळेला राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरिक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरिक्षक डी.एस. नैताम, आर.एन. मडावी पशुसंवर्धन अधिकारी पी.आर. सहारे व रेस्कू दलातील 21 रेस्कुअर यांनी विविध साहित्यासह प्रात्यक्षिक करुन आपत्ती व्यवस्थानाबद्दलची सविस्तर माहिती दिली. यावेळी मंचावर सृष्टी नेचर क्लबचे अध्यक्ष अर्पीत गुप्ता, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष परवेझ आकबाणी, नायब तहसिलदार थोरवे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रात तालुक्यातील ग्राम रेंगेपार कोठा येथील तलावात फल्ड वॉटर रेस्कु करीता लागणाऱ्या सर्व साहित्यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या चमूने हेविंग लॅाईन नॉटचा उपयोग व हेड टो, चीन टो, आर्म टो, बोटची माहिती,बोट ड्रील रेस्कु ऑपरेशन करतांना जर बोट पलटली तर कशाप्रकारे बोटला सरळ करुन रेस्कु ऑपरेशन मध्ये सहभागी व्हावे. लाईफबॉय द्वारे व्हिक्टीमला कशा प्रकारे वाचवू शकतो. याबाबत प्रात्यक्षिक व प्रशिक्षण उपस्थित नागरिकांना देण्यात आले. सदर प्रशिक्षण  व कार्यशाळेत लाखनी तालुक्यातील सर्व ग्राम पंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल, तलाठी, प्रशिक्षक वर्ग, महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचारी, एन.सी.सी.चे विद्याथी, एन.एस.एसचे विद्यार्थी, होमगार्ड, ग्रामपातळीवरील कृतीदलाचे सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन नायब  तहसिलदार माळी यांनी तर आभार प्रदर्शन तहसिलदार मलिक विराणी यांनी केले.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours