बीड: बहिणीने प्रेम विवाह केल्याचा राग आल्याने तिच्या पतीचा भरस्त्यात निर्घृणपणे खून करणाऱ्या बालाजी लांडगे आणि संकेत वाघ या दोघांना सहाव्या दिवशी पोलिसांनी अटक केली आहे.
19 तारखेला बहिणीच्या नवऱ्याची भावाने मित्रांच्या मदतीने धारधार शस्त्राने वार करून हत्या केली होती. गेल्या बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती. मयत सुमित वाघमारे हा आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होता. परीक्षा देऊन घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. कॉलेजपासून जवळच करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये सुमितचा जागीच मृत्यू झाला. या बाबतीत भाग्यश्रीच्या तक्रारारीवरून पेठ बीड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात अला होता.
मंगळवारी सुमितच्या दोन्ही मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या अटकेसंदर्भात माहिती देण्यासाठी  पोलिसांनी दूपारी 12 वाजता पत्रकार परिषद ठेवली आहे.
वाघमारे कुटुंबाला कुठलंही संरक्षण देण्यात आलेलं नव्हतं. जर पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही तर मी अन्नत्याग करेन, असा इशारा भाग्यश्री वाघमारे यांनी दिला होता. 4 तासांत आरोपींना पकण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं. पण घटनेला 6 दिवस झाल्यानंतर आज एका आरोपींना अटक करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours