रायगड, 03 डिसेंबर : मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठा अपघात झाला आहे. पुण्याहुन मुबंईला जाताना कोबंड्या वाहुन नेण्या-या पिकअप टेम्पोने अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली आणि यात 3 जण थोडक्यात बचावली आहे. या अपघातमध्ये 3 जण गंभीररित्या अडकले होते पण त्यांना सुखरुप बाहेर काढण्य़ात आलं आहे.
धडक लागल्यानंतर टेम्पोचा समोरचा संपूर्ण भाग चेपून गेला. त्यामुळे यात तिघेजण कँबिनमध्ये अडकले. गंभीररित्या अडकून तिघेही जखमी झाले आहेत. असं असताना IRB कर्मचारी आणि अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक सघंटनेच्या कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघांना वाचवलं आहे.
सोमवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान पुण्याहून मुबंईकडे जाणा-या लेनवर बोरघटात हा भीषण अपघात झाला आहे. मोहम्मद सुजू, आझाद मोहम्मद आणि भवानी प्रसाद अशी जखमींची नाव आहेत. अपगात होताच त्यांना योग्य मदत मिळाल्यामुळे आज यांचा थोडक्यात जीव वाचला असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, उपचारासाठी या तिघांनाही कोमोठेच्या एसजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे मुबंई-पुणे मार्गावर ऑईल साडंल्याने रात्री मोठी वाहतुक कोंडी झाली होती.
बोरघाटात जुन्या मार्गावर टाटा रोड ते शिग्रोबां मंदीरापर्यंत एका टँकंरने आईल साडंवलं होतं. रस्त्यावर ऑईल असल्यामुळे इतर वाहनं घसरत होती. यात एक बाईकस्वारही जखमी झाला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours