भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने २९ आॅक्टोबर रोजी मुंबई हायकोर्टाचा निर्णयाला स्थगिती दिली होती. मुंबई कोर्टाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी वेळ मागण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने या निर्णयावर नोटीस पाठवली होती.
गुजरात दंगल प्रकरणाची सुनावणी
2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर जणांना क्लीनचीट दिली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यावर सुनावणी होणार आहे.
मागील वर्षी गुजरात हायकोर्टाने नियुक्त केलेल्या एसआयटीने चौकशी अहवालात नरेंद्र मोदी यांच्यासह 59 जणांना क्लीनचिट दिली होती. तो निर्णय कायम राखला आहे.  2002  गुलबर्ग सोसायटी हिंसाचार प्रकरणी  जाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावली होती.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी जबाब नोंदणी
2008 मालेगांव प्रकरणी साक्षीदारांची जबाब नोंदणी
2008 मध्ये मालेगाव इथं बाँबस्फोट प्रकरणी सुनावणीत एनआयई कोर्टात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. या प्रकरणात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर १०० जण जखमी झाले होते.
राहुल गांधींचा तेलगंणा दौरा
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सभा घेणार आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री डीके अरुणा यांच्या प्रचारासाठी गडवाला इथं राहुल गांधी प्रचार सभा घेणार आहे. तेलंगाणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
सुषमा स्वराज युएईच़्या दौऱ्यावर
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या संयुक्त राष्ट्रात पार पडणाऱ्या द्विपक्षीय बैठकीसाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यादरम़्यान यूएईचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुला बिन झायद अल निहायन यांच़्यासोबत भारत आणि युएईमधील विविध मुद्यांवर चर्चा करणार आहे. आर्थिक आणि तंत्रज्ञानावर भर देणार असल्याचं कळतंंय.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours