भंडारा- जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी

भंडारा----जिल्ह्यात १डिसेंबर २०१८ पासुन दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट वापरण्यासाठी प्रशासनाकडुन सक्तिचे केले आहे.ज्यांच्याकडे हेल्मेट नाही त्यांच्याकडुन पाेलिस प्रशासनाच्या वतीने दंड आकारणी केले जाते त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.हेल्मेट सक्तिचे स्वागत सर्वसामान्य जनता करितंच आहे यात काही शंका नाही परंतु ही सक्ति जनजागृति करुन करणेे लाेकशाहीसाठी याेग्य असल्याचे मत निवेदनाद्वारे अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विराेधी सामाजिक न्याय मंचाने भंडारा जिल्हाधिकारी यांना मांडला आहे.
------भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकडाे हेल्मेट ची दुकाने लावण्यात आली आहे.हेल्मेट विकणारे सर्व परप्रांतिय लाेकं आहेत पाेलिसांचा दंडुकामुळे नागरिक धस्तावले असुन वाटेल त्या ठिकानाहुन हेल्मेट खरेदी करुन घेत आहेत.त्या हेल्मेट ची किंमत एकाकडुन ३०० रु.,दुसऱ्याकडुन ४००रु.,तिसऱ्याकडुन ५००रु.तर चाैथ्याकडुन ६०० रु.घेवुन ग्राहकांची फसवणुक केली जात आहे.ग्राहकांना या हेल्मेट ची बिलं सुद्धा दिली जात नाही.हा सर्व प्रकार जिल्हा प्रशासनाच्या नजरेसमाेर हाेत आहे त्यामुळे सरकारने लावलेली GST (कर) ही सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या डाेळ्यादेखत हडपण्याचा प्रकार सुरु आहे.अश्याप्रकारे जनतेची दिशाभुल करुन जील्हा प्रशासन व हेल्मेट विकणारे दुकानदार ग्राहकांची फसवणुक करित आहेत.जास्त दरात हेल्मेट विक्री करणाऱ्या व बिल न देणाऱ्या दुकानदारांवर व जिल्हा प्रशासनावर भादवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करुन कार्यवाही करण्यात यावी अशी अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विराेधी सामाजिक न्याय मंचाने जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देवुन मागणी केली आहे ।Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours