मुंबई : वाऱ्याची दिशा आणि हवेच्या दाबाची स्थिती पाहता राजस्थान, गुजरात मार्गे उत्तर महाराष्ट्र व विदर्भात थंड वारे मोठ्या प्रमाणात येतील आणि सध्याची थंडी कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शिमला आणि काश्‍मीरसह उत्तरेतील अनेक भागात बर्फवृष्टी होणार असल्यामुळे पुढील्या 8 दिवसात मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. शनिवारी सर्वीत कमी तापमानाची नोंद नागपूर येथे 6.3 अंश सेल्सीयस अशी झाली.
राजस्थानात अधिक हवेचा दाब निर्माण झाला असून, उत्तरेतील शीतलहर उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने प्रवाहित होत आहे. यामुळे 25 डिसेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव जिल्ह्यांत थंडीचं प्रमाण सर्वाधिक राहणार आहे. तर नंदूरबार, नाशिक आणि पश्‍चिम महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम राहील. 26 डिसेंबर रोजी मध्य आणि पूर्व विदर्भ तसेच मराठवाड्यात थंडीचे प्रमाण वाढेल तर उत्तर महाराष्ट्रात ते मध्यम स्वरूपाचे आणि कोकणात व मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी होईल. 27 आणि 28 डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचं आणि विदर्भ आणि मराठवाड्यात ते अधिक राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours