क्राईम रिपाेर्टर संदिप क्षिरसागर
भंडारा- भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा,सुर नदी,चुलबंद नदी तसेच अनेक नाले आहेत.या रेती घाटाचा लिलाव शासनाने केलेला नाही त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील रेती घाटातुन अहाेरात्र अवैध रित्या माेठ्याप्रमाणात जेसीबी मशीनद्वारे चाेरी केली जात आहे.ह्या रेतीचे दाेन प्रकार असुन पांढरी शुभ्र व चमकदार रेती ही नागपुर शहरात जास्त दरात विकल्या जात आहे.काळसर दानेदार किंवा भूसभूसा असलेली रेती ही भंडारा शहरात दाेन ते तिन हजार रुपये प्रती ट्रक्टर भावाने विकली जात आहे.या अवैध रेती उपसामुळे पर्यावरणाला माेठा धाेका निर्माण झाला आहे.नदीतील रेती उपसा करुन ठिकठिकाणी रेती चे ढग साचवल्या गेले आहेत.हे ढग रात्रिच्या वेळेस ट्रक मधे भरुन पाठविले जात आहे त्यामुळे नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे .हा सर्व प्रकार शासनाच्या व संबंधित अधिकाऱ्यांचा डाेळ्यादेखत सुर आहे.या कडे काेनीही लक्ष देत नाही त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील रेती तस्करांचा हाैसला बुलंद झाला असुन ते काहीही करायला तयार आहेत.यांच्यावर याेग्य ती कार्यवाही करण्यात यावी तसेच पर्यावरण वाचविऩ्यात यावे यासाठी अ.भा.भ्रष्ट्राचार विराेधी सामाजिक न्याय मंचाचे विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी,विष्णुदास लाेणारे,सचिन मेश्राम,राकेश चाेपकर,लक्ष्मिकांत दांडैकर,सुशील जनबंधु,सुरज निबांर्ते, दिपक वाघमारे,बंडु मलाडे यांनी उपजिल्हाधिकारी (महसुल) सुभाष चाैधरी यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना, महसुल मंत्री,पर्यावरण मंत्री,यांना निवेदन पाठविले आहे की ,भंडारा जिल्ह्यात फाेफावलेल्या अवैध रेती तस्करावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी तसेच पर्यावरण वाचविण्यात यावे अशी मागणी केली ।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours