औरंगाबाद, 01 डिसेंबर : औैरंगाबादमध्ये पाण्यासाठी एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाणी भरणाऱ्या महिलेचा टँकरखाली दबून मृत्यू झालाचा धक्कादायक प्रकार फुलंब्री तालुक्यातील निमखेडच्या जोशी वस्तीवर समोर आला आहे.
रात्रीच्या वेळी टँकरमधून गळणारं पाणी भरताना या महिलेचा मृत्यू झाला. सुनिता हटकर असं या मयत महिलेचं नाव आहे. टँकरमधील गळणारे पाणी भरतांना महिला टँकरखाली दबली गेली. त्याच तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
ते झालं असं की, रात्रीच्या वेळी शेतातल्या विहिरीतून टँकर पाणी भरत होता. या मागच्या एका चाकाजवळ पाण्याचा टँकर गळत होता. शेतात टँकर असल्याने पाणी गळून माती ओली झाली आणि नेमकं महिला पाणी भरत असलेल्या बाजूचं चाक चिखलात रुतलं गेलं आणि टँकर कलंडला.
टँकरखाली दबल्यागेल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर मुळातच रात्रीच्या वेळी पाणी भरण्याची परवानगी नाही आहे. त्यामुळे पाण्यासाठी टँकर रात्री शेतात काय करत होता असाही सवाल आता विचारला जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तर या सगळ्या प्रकारावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या टँकर चालकाची चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे पाण्यासाठी अशा गंभीर पद्धतीने जीव गमावल्यामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours