मुंबई, 01 डिसेंबर : यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजलं असं म्हणायला हरकत नाही कारण. या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळालं आहे. त्यावर आता राज्यपाल विद्यासागर राव यांनीदेखील स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांची सरकारने बोलती बंद केली अश्या चर्चांना सध्या उधाण आलं.
त्यात हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधक आणि युतीच्या मुद्यावर कोटी करताना मुख्यमंत्र्यांनी शेरोशायरी केली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या कवितेमधून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर ताशेरे ओढेले आहे. तर सामनावरही टीका केली आहे.
तर त्यांनी या कवितेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष यात्रेवर कोटी केली.
मुख्यमंत्र्यांची कविता...
"माझ्यावर टीकेची करून कामना
विखे पाटील वाचतात सामना
संघर्ष यात्रेला लाभेना गर्दी
म्हणून त्यांच्या घरी वर्तमानपत्रांची वर्दी
जनता जनार्दन आमच्याच बाजूला
आणि तुमची खुर्ची असेल 'त्याच' बाजूला
2019 चा महासंग्राम आला जवळ 
बाजी मारणार सेनेचा बाण अन भाजपचे कमळ!"
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours