मुंबई: पालघर-केऴवे रोड स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे लोकल 20 मिनिटापर्यंत उशिरानं धावत आहे. तसंच एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूकही अर्धा तास उशिराने सुरू आहे.

पालघर-केऴवे रोड स्टेशनदरम्यान सकाळी पाचच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अजूनही ही लोकल सेवा पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. यामुळे चाकरमान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

दुसरीकडे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मस्जिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यासाठी चारही मार्गांवर सकाळी 10:30 ते सायंकाळी 4:30 यादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

मेगाब्लॉकमधील सहा तासांच्या कालावधीत मशिद आणि सँडहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. हार्बरवरही सीएसएमटी ते वडाळा स्थानकांदरम्यान एकही लोकल धावणार नाही. भायखळा आणि सीएसएमटीपर्यंत सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालतील. 




Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours