जिल्हा प्रतिनीधी --शमीम आकबानी

(सावली निर्माण करण्यासाठी उन्हातच उभे राहावे लागते - गिरीश पांडे)

राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय आणि समर्थ विद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्व शंकरराव भदाडे यांच्या स्मृति प्रीत्यर्थ ग्रेट भेट कवी आणि कालावंतांशी कार्यक्रम समर्थ विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवी लोकनाथ यशवंत आणि प्रसिद्ध सिने कलाकार गिरीश पांडे, मुंबई हे लाभले होते. कवी लोकनाथ यशवंत यांच्या कविता वर्ग १० ते एम ए पर्यंतच्या अभ्यासक्रमाला असून प्रत्यक्ष कवींनी कविता सादरीकरण केले. कवी लोकनाथ यशवंत यांनी विद्यार्थ्यांना आपले ज्ञान हे व्यापक करा, लहान लहान गोष्टी मधून मार्ग काढायला शिकले पाहिजे. आपले अनुभव सांगताना ते पुढे म्हणाले की, मी दहाव्या वर्गात तीनदा नापास झालो मात्र आज एम ए ला कविता आहे, हे फक्त माझ्यातील कविमनामुळे सिद्ध झाले. माझी कविता ही गरीब, दुःख, दिन हे जिथे असेल त्यांच्या उत्थानासाठी लिहिलेली आहे.  सुप्रसिद्ध सिने अभिनेता गिरीश पांडे यांनी सांगितले की, वाचन, मनन आणि लेखन हे या विश्वाचे गमक आहे. मराठी बोलणे लिहिणे यातून आपले व्यक्तिमत्व कळते. मी अमिता बच्चन यांच्या सोबत काम करत असतांना त्यांच्या भाषिक समृद्धतेचा संस्कार अनुभवता आला. आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर उन्हात उभे राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक दा ई प्रधान, डॉ संजय निंबेकर, डॉ सुरेश खोब्रागडे, किशोर आळे, राजेंद्र भदाडे, विकास खेडीकर, प्रशांत ढोमने, श्रीकृष्ण पटले, शिवलाल निखाडे, ऍड कोमलदादा गभणे, अतुल भांडारकर, विजया घनमारे, सी एम बागडे, कारवट, देशपांडे, ग्रंथपाल पवन पडोळे आदी प्रमुख गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. याकार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य भांडारकर, संचालन अक्षय मासुरकर तर आभार गोवर्धन शेंडे यांनी मानले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours