मुंबई, 18 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबई विमानतळावर राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी त्यांच्या या दौऱ्यात महाराष्ट्रातील विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत.
पुणे आणि कल्याण मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होईल. आधी उत्तर भारतीय मंचाचा विरोध आणि नंतर शिवसेनेनं टाकलेल्या बहिष्कारामुळे मोदींचा हा दौरा चर्चेत आहे.
उद्धव ठाकरेंचे शिवसेना मंत्र्यांना आदेश
उद्घाटन सोहळ्याचं शिवसेना मंत्र्यांना निमंत्रण असलं तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळेच आता मोदींच्या या कार्यक्रमाला मंत्र्यांनाही न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.
उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आता निमंत्रण असूनही राज्यमंत्री विजय शिवतारे हे पुण्याच्या तर एकनाथ शिंदे हे कल्याण इथल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला जाणार नाहीत. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई समोर आली आहे. सोमवारी कोस्टल रोडचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकला होता.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours