तमिळनाडू, 26 डिसेंबर : मागच्या लोकसभा निवडणुकांवेळी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना खुलं समर्थन करणारे योगगुरू बाबा रामदेव यांचा निर्णय या आता डगमगलेला दिसतो. कारण 'आताच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होणार याबद्दल काही सांगू शकत नाही', असं विधान त्यांनी केलं आहे.
तमिळनाडू राज्यातील मदुराई या शहरात एका कार्यक्रमावेळी रामदेव बाबा बोलत होते. "देशाची राजकीय परिस्थिती सध्या खूप कठीण आहे. त्यामुळे पुढचे पंतप्रधान कोण असेल हे सांगता येत नाही", असं रामदेव बाबा म्हणाले.
योगगुरू रामदेव बाबा पुढे म्हणाले की, 'मी राजकारणावर लक्ष देत नाही. मी कोणाचंही समर्थन अथवा विरोध करत नाहीये. आमचं लक्ष सांप्रदायिक किंवा हिंदू भारत निर्माण करण्याचं नाही तर आध्यात्मिक भारत आणि जगाची निर्मिती करण्याचं आहे.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours