मुंबई, 26 डिसेंबर : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतलांय. माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपैयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी 'मन की बात' मधून केलेल्या वक्तव्यांवर ठाकरी शैलीत टीका केलीय.
सध्याचे सरकार जनतेच्या मोबाईल आणि कंप्यूटरवर हेरगीरी करून सत्ता टिकवण्याचा प्रयत्नं करतेय. तसेच सत्ता हाच ऑक्सीजन असल्यासारखे वागून युतीच्या हिंदुत्वाचे ऑक्सीजन सिलेंडर लुटण्यात आलेत. आणि जनतेने जेंव्हा सत्ताधाऱ्यांच्या ऑक्सीजनच्या नळ्या काढल्या तेंव्हा शिवसेनेसोबत युती होणारच याच्या स्वयंभू घोषणा दिल्या जात असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.
काय लिहलं आहे सामना अग्रलेखात...
'इंदिरा गांधी यांनी सत्ता हाच ऑक्सिजन मानला तेव्हा त्यांचा पराभव झाला. सध्याचे सरकार लोकांच्या कॉम्प्युटर व मोबाईलवरसुद्धा हेरगिरी करत आहे. हे निर्मळ लोकशाही, स्वातंत्र्याचे लक्षण नाही. सत्ता टिकवण्याची तडफड आहे. जेव्हा अटलजी बोलत तेव्हा देश बोलत असे. अटलजींची वाणी ही केवळ भाजपचीच वाणी नव्हती तर या देशातील सर्वसामान्य जनतेची ‘वाणी’ होती असे मोदी यांनी सांगितले ते खरेच आहे. आजच्या वातावरणात जनतेची ती वाणीच हरवल्यासारखे वाटत आहे. पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत भावनिक भाषण केले. अटल युगाचे विस्मरण देशाला कधीच होणार नाही.'
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours