मुंबई: येत्या काळात सत्ताधारी भाजपवर मात करायची असेल तर युती आणि आघाडीला पर्याय राहणार नाही. छोटे आणि प्रादेशिक पक्षांचं वजन वाढणार आहे. विरोधकांचे खरे ऐक्‍य हे निवडणुकांच्या निकालांनंतरच होऊ शकते. ही वक्तव्यं आहेत महाराष्ट्रातल्या सर्वांत सीनियर आणि प्रबळ नेत्याची... या राजकीय धुरंधराची भूमिका पुढच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते असं आतापासून बोललं जातंय.

राज ठाकरे, नारायण राणे, राजू शेट्टी, संजय काकडे यांच्यापासून ते अगदी ममता बॅनर्जी एम. के. स्टॅलिन, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, नितीश कुमार, शरद यादव आणि अगदी तेजस्वी यादवपर्यंत अनेक राज्यांच्या अनेक पक्षांच्या संपर्कात असलेले हेच महाराष्ट्रातले प्रबळ नेते अर्थातच शरद पवार. गेल्या काही काळात शरद पवार या यादीतल्या सगळ्यांना आणि आणखीही काही नेत्यांना भेटले. तिसऱ्या आघाडीची शक्यता चाचपडून बघताना अशी आघाडी झालीच तर त्यात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राचा हाच मुरलेला राजकारणी निभावणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

मोदींनी पंतप्रधानपदाचा आब राखला नाही : शरद पवार

पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावताना दिसतोय. दुसरीकडे तिसऱ्या आघाडीच्या चर्चा करणाऱ्या नेत्यांना मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली काँग्रेसची घोडदौड धक्का देऊ शकते. म्हणूनच आघाडीच्या राजकारणात मुरलेल्या जुन्या जाणत्या शरद पवारांचं महत्त्व या प्रादेशिक पक्षांना पुन्हा एकदा जाणवणार हे नक्की आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours