रिपोर्टर... परदेशी
लाखांदूर. तालुक्यातील तिरखुरी येथे मंडई च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले की, झाडिपट्टीची बोलीभाषा आणि ग्रामीण भागात समाजात घडत असणाऱ्या घटना यांचा सुंदर मिलाफ करुन एक नाटक तयार करण्यात येते. त्याच नाटका मधुन हुंडाबळी, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती अशा अनेक विषय असतात आणि ग्रामीण भागात नाटक बघणारे बर्या पैकी असल्याने समाजात हे विषय रोवले जातात त्यामुळे नाटकाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्यात झाडीपट्टीतील नाटक महत्वाची भुमिका पार पाडत आहेत. असे विलास वाघाये आपल्या अध्यक्षीय भासणातुन बोलत होते.     
          या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जि. प. सदस्य शुध्दमताताई नंदागवली, जि. प. सदस्य मनोहर राऊत, जि. प. सदस्य प्रदिप बुराडे, सरपंच उत्तम भागडकर,मनोज चुटे, संतोष शिवणकर, मा. सरपंच मधु रोहणकर, लेखक हरिश गेडाम, सरपंच मिना शेंडे,अमोल आजबले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर खेडीकर यांनी तर आभार मारोती चाचेरे यांनी केले आणि कार्यक्रम बघण्यास परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours