सांगली: तासगाव तालुक्यातील बोरगाव इथं चुलत बहिणभावामध्ये असलेल्या प्रेम प्रकरणाला घरातून असलेला विरोध पाहून विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. गणेश बाळासो पाटील (वय 34), सारिका संभाजी पाटील (वय 20) अशी या दोघांची नावं आहेत.
सांगलीच्या बोरगाव इथे पाटील भावकीमध्ये सारिका आणि गणेश हे दोघे शेजारी शेजारी राहतात. ते नात्याने चुलत भाऊ-बहिण लागतात. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. मात्र घरातून विरोध होत असल्याने दोघेही काही महिन्यांपूर्वी घरातून पळून गेले.
दीड महिन्यांपूर्वी दोघेही घरी परत आले. यावेळी घरच्यांनी त्यांना समजावून सांगत ‘तुम्ही नात्याने भाऊ बहिण आहात, हे समाजापुढे सर्व चुकीचे आहे’, अशी समजूत काढली. मात्र दोघेही उदास हेाते. यानंतर गणेश कोल्हापूर इथं नोकरीसाठी गेला. तर सारिका घरीच होती.
सोमवारी रात्री 9 च्या सुमारास गणेश गावामध्ये आला. यावेळी त्याने आपण आल्याचे कोणालाच सांगितलं नाही. याचवेळी सारिकादेखील घरामधून बाहेर पडली. पूर्वनियोजित घरापाठीमागे असणाऱ्या द्राक्षबागेमध्ये दोघेही भेटले आणि त्याच ठिकाणी घरच्यांचा विरोध असल्याने नैराश्यापोटी विषप्राषन करून आत्महत्या केली. या प्रकरणामुळे गावात खळबळ माजली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours