मुंबई: हार्बर रेल्वे मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली होती. पण आता हार्बर रेल्वेवरील पनवेल- खांदेश्वरदरम्यान रेल्वेचा विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हार्बर मार्गावर मानसरोवर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. हार्बर लाईनवरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाश्यांचे मोठे हाल होत होते.

हार्बर मार्गावरील मानसरोवर स्थानकावर ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती सांगण्यात येत होती. दरम्यान गेल्या दीड तासापासून ही वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे कामाच्या घाईत घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.

सध्या वाहतूक पूर्ववत झाली असून काही वेळ रेल्वे उशिराने धावत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours