धुळे: "राज्यात सरकारच्या मेगा भरतीबाबत आता कोणतीही बंदी नसून लवकरच आम्ही मेगा भरती बाबत जाहिरात काढणार आहोत" अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. "मेगा भरतीबाबत न्यायालयीन मार्ग मोकळा झाला असून लवकरच भरती बाबतची कारवाई सुरू होईल. 2 टप्प्यात होणाऱ्या या भरतीमध्ये आधी 32 हजार पदं भरली जाणार आहेत" असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहे.
"नर्मदा आणि तापी नदीतील गुजरात राज्यात वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला वापरण्यासाठी नियोजन सुरू असून आपलं पाणी वाया न जाता आपल्याला पाणी कसे मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय" अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, "उपसा सिंचन योजनांवर मोठ्याप्रमावर वीज बिल खर्च होत असून त्या सर्व योजना सौर ऊर्जेवर नेण्यासाठी सरकारने जीआर काढला असून सरकारचा प्रयत्न सुरू" असल्याचं ते यावेळी म्हणाले आहे.
"राज्यातील DBT योजनेत सर्व शिष्यवृत्ती सरकार ऑनलाईन देत असून यापुढे कोणत्या प्रकारे ऑफलाईन शिष्यवृत्ती मिळणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours