बीड 26 डिसेंबर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीय. उन्हाळा सुरू होण्याला अजुन तीन महिने शिल्लक असले तरी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्यासाठी दररोज शंभर रूपये द्यावे लागत असतील तर खायचं काय? असा सवाल इथल्या महिलांनी केलाय.
बीड जिल्ह्यातल्या मादमोळी गावात महिलांना सध्या एकच काम करावं लागतंय. सकाळी उठलं की पाण्यासाठी घराहाबाहेर पडावं लागतं तेव्हा कुठे हंडाभर पाणी त्यांना मिळतं. पैसे देवून विकत घेतलेल्या पाण्याची खरी किंम्मत आज या लोकांना कळाली आहे. सर्वसामान्य लोकांना पाण्यासाठी पैसे आणायचे कसे या विचारानेच त्यांच्या तोंडचं पाणी पळालंय.
या वर्षी बीड जिल्हा भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहे पाण्यासाठीची पायपीट आणि वनवण ही तर रोजची झाली, मात्र बीड जिल्ह्यांत पाणी पुरवठा योजनासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करुन देखील बहुतांश गावात पाणीच आलेलं नाही असचं काही चित्र आहे, अपूर्ण, वादग्रस्त आणि बंद योजनांची संख्या जिल्ह्यात 80%च्या वर आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours