विवेकाचा आवाज बुलंद करूया
मअनिस सभासद मोहीम
भंडारा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने २९ डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे निःशुल्क सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून भंडारा शहरातील मअनीस च्या वतीने खांबतलाव येथिल गोखले बालोद्यान जवड टेबल खुर्ची व ब्यानर लावून मअनीस सभासद नोंदणी सकाळी ११.०० वाजता सुरू करण्यात आली याप्रसंगी मअनीस तर्फे प्रसिद्धीसाहित्य व पुस्तकाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विदर्भ कार्याध्यक्ष गजेंद्र सुरकार याच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे होते या कार्यक्रमाला जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे,प्रधान सचिव कन्हैया नागपुरे ,भंडारा शहर कार्याध्यक्ष अमित मेहर, संस्कृती अभिव्यक्ती विभाग जिल्हा कार्यवाह गणेश लिमजे, सामाजिक कार्यकर्ता अरूण भेदे, दादी मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते.
शेकडो नागरिकांनी निशुल्क सभासद नोंदणी केली यावेडी विवेकाचा आवाज बुलंद करूया महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा मुक्त करूया तसेच समाजात विज्ञाननिष्ठ समाज घडवू अशी शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संतोष वैद्य, यशपाल गभणे , राहुल ढोमने,प्रमोद चाचेरे,गोविंदा नेवारे, विलास पटेल , सुरज मोटघरे, दिनेश बोरकर,संदीप मारबते,भारत मते,विजय भांडारकर,सौ कविता लोणारे ,विलास केजरकर ,रौनक साखरकर, अभिषेक आंबागडे यांनी अथक परिश्रम घेतले.
Post A Comment:
0 comments so far,add yours