मनमाड: सैराट सिनेमात चित्रित केलेला प्रसंग रिअल लाईफमध्ये घडला आहे. बहिणीने प्रेम विवाह केल्यामुळे समाजात आणि नातेवाईकांमध्ये बदनामी होईल या भीतीने भावाने सख्या बहिणीचा गळा आवळून खून केल्याचं समोर आलं आहे.
नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहीवड इथं ही घटना घडल्याचं समोर आलं. खून केल्यानंतर या तरुणीचा-घाईघाईने अंत्यविधी करण्यात येत असताना पोलिसांना आलेल्या एका निनावी फोनमुळे या घटनेचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी खून करणाऱ्या भावाला बेड्या ठोकून गजाआड केलं.
देवळा तालुक्यातील दहीवड या छोट्याशा गावात प्रियांका सोनवणे ही तरुणी आपले आई-वडील आणि भावा सोबत राहत होती. तिचं आत्येभावा सोबत प्रेम प्रकरण जुळल्यानंतर तिनं त्याच्या सोबत लग्न करून संसार थाटला. मात्र बहिणीच्या या कृत्यामुळे समाज आणि नातेवाईकांमध्ये बदनामी झाल्याची सल प्रियांकाचा भाऊ रोशन सोनवणे याच्या मनात टोचत होती अखेर संधी मिळताच त्यानं बहिणीचा गळा आवळून खून केला.
खून केल्यानंतर प्रियांकाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा बनाव करत तिचा घाईघाईने अंत्यविधी केला जात असतांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पोलिसांना या खुनाची माहिती दिली.
Post A Comment:
0 comments so far,add yours