बीड, 14 डिसेंबर : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केला आहे. ही धक्कादायक घटना बीडमधील शहाजानपुर इथं  घडली. पोलिसांनी अवघ्या 6 तासांत वेगवान तपास करत आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.

माजलगाव तालुक्यातील शहाजानपुर इथल्या कावेरी बाळासाहेब शिंदे हिने प्रियकर विठ्ठल गुलाब आगेच्या संगनमताने कट रचला. पहाटे एक वाजता पती बाळआसाहेब हा शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेला. 1 तासाने त्याची पत्नी व तिचा प्रियकर हे शेतात आले. त्यांनी बाळासाहेब यास मारहाण करत रुमालाने गळा आवळून खून केला.

खूनाचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी हा अपघात असल्याचा बनाव केला. त्यासाठी त्यांनी मृतदेह विद्युत प्रवाह असलेल्या कुंपणावर टाकला. पोलिसांना याप्रकरणी संशय आल्यानंतर त्यांनी संशयावरून आगेला ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.

अनैतिक संबंधासाठी पतीचा हत्या आणि नंतर हा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह थेट विद्युत तारेवर टाकण्यात आला. या सर्व धक्कादायक प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours