नवी दिल्ली, 14 : वादग्रस्त राफेल कराराबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार आहे. राफेल कराराची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, यासाठी अॅड. विनीत ढांडा यांनी याचिका दाखल केली होती. तसंच सरकारवर विविध आरोप करत या कराराविरोधात इतरही काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

राफेल करारातील कथित अनियमिततेसाठी सीबीआयला FIR दाखल करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकांद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे आज राफेल प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात सरकारची मोठी परीक्षा आहे, असं म्हटलं जात आहे.

काय आहे राफेल प्रकरण?

राफेल या लढाऊ विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा भ्रष्टाचार केला, असा राहुल गांधींचा आरोप आहे. 'राफेल विमानांची मोदी सरकारने अचानक किंमत वाढवली. तसंच भारतातील अनुभवी किंपनी 'एचएल'ला डावलून राफेल करारामध्ये उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीचा समावेश करण्यात आला. हे सर्व अनिल अंबानींच्या वैयक्तिक फायद्यासाठी केलं गेलं,' असा राहुल गांधींचा आरोप आहे. 

राफेलच्या मुद्द्यावरून गेले काही दिवस काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. तसंच या मुद्द्यावरून राहुल यांनी राफेल विमान बनवणाऱ्या ‘दसॉ’ या कंपनीवरही आरोप केले होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours