मुंबई : भाजपला घरचा आहेर देणारे पुण्याचे भाजपचे खासदार संजय काकडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच कानउघडणी केल्याची सूत्रांनी माहिती दिली. पक्षावर टीका करणे योग्य नसून खबरदारी घ्या असा शब्दात फडणवीस यांनी काकडेंना सुनावल्याचं कळतं आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर संजय काकडे यांनी आपल्याच पक्षावर टीका केली होती. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही काकडे यांनी काल बुधवारी भेट घेतली होती.

आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय काकडे यांना फोन करून चांगलंच झापलं. पक्षावर टीका करणे हे योग्य नाही. पक्षाचं गांभीर्य लक्षात घ्या अशा शब्दात फडणवीस यांनी काकडेंना झापून काढलं.

तसंच या पुढे  योग्य ती खबरदारी घ्या अशी सुचनाही फडणवीस यांनी काकडेंना केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours