मुंबई, 29 डिसेंबर : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांचा मुलगा जयदेव ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटत मानवंदना दिली आहे. जयदेव ठाकरे यांनी बऱ्याच काळानंतर काढलेलं हे व्यंगचित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

ठाकरे कुटुंब आणि व्यंगचित्र हे नातं काही नवीन नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून राज ठाकरे हे त्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांसाठी ओळखले जातात. बाळासाहेबांचा मुलगा असलेले जयदेव ठाकरे हेदेखील व्यंगचित्र रेखाटत असतात.

जयदेव ठाकरे यांचं एक नवं व्यंगचित्र समोर आलं आहे. या व्यंगचित्रात त्यांनी शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण आणि त्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा रेखाटली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours