नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपुर विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून चांगला दंड वसूल केलाय. फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी विभागाने खासं पथकं स्थापन केली होती. त्यांनी धडक कारवाई करत शुक्रवारी तब्बल साडेचार लाखांचा दंड वसूल केला.

मध्य रेल्वेच्या या कारवाईत  25 रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि 84 टीसींचा समावेश होता. त्यांची विविध पथकं तयार करण्यात आली होती. गर्दीची आणि मोक्याची ठिकाणं निवडून त्या ठिकाणी ही पथकं नेमण्यात आली. आणि कारवाई करण्यात आली. या अचानक करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास 1181 प्रवाशांकडे तिकीट सापडलं नाही. या सर्व प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून चार लाख अठ्ठावन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

यातील काही प्रवाशांकडे तिकीटावर परवानगी असलेल्या क्षमतेपेक्षा जास्त सामान होते. अशा प्रवाशांकडून 1 लाख रुपये एकाच दिवशी वसूल करण्यात आले. प्रवाशांची संख्या प्रचंड  वाढली आणि स्टेशनचाही विस्तार झाला त्यामुळे टीसी आणि इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडते त्यामुळं फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणं शक्य नसतं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours