मुंबई: "राज्यात दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये तरूण-तरुणींसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून 4242 पदांची भरती केली जाणार आहे", अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 4242 पदांसाठी लवकरच महामंडळाच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. या सर्व पदांसाठी एकाच दिवशी संबंधित जिल्ह्यात परीक्षा होणार आहे.
औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या पंधरा जिल्ह्यात ही मेगाभरती होणार आहे. परंतु, यापैकी 11 जिल्ह्यात 4242 पदांच्या जागा आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक अथवा वाहक पदांसाठी रिक्त जागा नाहीत. असं असलं तरी या चार दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील तरूणाच्या हातात काम देण्यासाठी या जिल्ह्यातील पात्र, उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा आहे आहेत, तिथे नियुक्यता दिल्या जातील. तसंच ज्यावेळी या दुष्काळग्रस्त चार जिल्ह्यात चालक अथवा वाहक पदाच्या जागा रिक्त होतील, तेव्हा या उमेदवारांना पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात नियुक्ती देण्यात येईल, असं परिवहन महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours