19 डिसेंबर : "जहाँ पे मोदीजी के हात लगते, वहाँ काम होता नही" ! मुंबई आणि पुण्यात मोदींनी भूमिपूजन केलेलं एकही काम पूर्ण केले नाही. शिवस्मारक आणि इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचं काय झालं असा सवाल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थिती केला.
आज बीडमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने दुष्काळी उपाय योजना संदर्भात जिल्हाअधिकारी यांना निवेदन दिलं. तसंच विरोधी पक्ष नेत्यांनी दुष्काळी आढावा बैठक घेतली. दुष्काळी आढावा बैठकीनंतर पत्रकाराशी संवाद साधताना धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी मुंडेंनी केंद्र आणि राज्य सरकारचा दुष्काळाबाबतीत भोंगळ कारभार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या पथकांनी पाहणी केली, मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मात्र उपाय योजना काहीच नाही. पाणी टँकर, चारा छावण्या, रोजगार यांच्या बाबतीत निर्णय नाही हे दुर्दैव आहे अशी टीका मुंडेंनी केली.
दुष्काळ जाहीर केला पण जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंञी यांचे लक्ष नाही,मुख्यमंत्री यांनी बैठक घेतली पण पदरात काहीच पडलं नाही. उलट इथलं प्रशासन रेशनचे 75 टक्के धान्य कपात करत असेल तर ही कुठली उपाय योजना असा प्रश्न उपस्थिती केला.
हे सरकार दुष्काळाबाबतीत गांभीर्याने घेत नसेल तर उद्या राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करेल असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours